शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
शिर्डी : नगरपरिषद व्हावी यासाठी शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रीक निवडणूकीवर सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्यासाठी बैठक घेऊन प्रक्रिया सुरू केली असून याविषयावर आज अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सर्वानुमते जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान २१ डिसेंबरला होणाऱ्या शिर्डी नगरपंचायतच्या निवडणूकिवर बहिष्कार टाकण्यासाठी शिर्डी शहरातील हॉटेल टेम्पल व्यु येथे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या पुढाकारातून मंगळवारी रात्री आठ वाजता सर्वपक्षीयांची नेतेमंडळी तसेच ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जेष्ठ नेते कैलासबापू कोते, काँग्रेसचे नेते तथा साईसंस्थानचे विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर,शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, साईसंस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, शहराध्यक्ष सचिन शिंदे, गजानन शेर्वेकर, जेष्ठ नगरसेवक अभयराजे शेळके, गटनेते अशोक गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, अँड अनिल शेजवळ, मंगेश त्रिभुवन, नितीन उत्तम कोते, मनसेचे दत्तात्रय कोते, शिवसेना तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे, विजय जगताप, शहरप्रमुख सचिन कोते, अरविंद कोते, सुनील गोंदकर, दादाभाऊ गोंदकर, ताराचंद कोते, सुधीर शिंदे, अशोक गायके, नितीन शेळके, विजय कोते, दिनूमामा कोते, दिपक वारूळे, दत्ता कोते, किरण कोते, सलीम शेख, संजय शिर्डीकर, शब्बीरभाई सैय्यद, बाबा दोडीया, समिर शेख, देवानंद शेजवळ,अँड अविनाश शेजवळ, रमेश कोते, दत्ता आसणे, सुनील पारख, किरण बो-हाडे, श्री भडांगे, स्वराज त्रिभुवन, प्रकाश गोंदकर,रासपचे नाना काटकर, वंचित आघाडीचे विशाल कोळगे, तानाजी गोंदकर, राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, लखन बेलदार, नरेश सुराना,पत्रकार राजेंद्र भुजबळ, रवींद्र सोनवणे, आनंद बुधेकर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिर्डी शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याअनुषंगाने सन २०१६ मध्ये नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन नगरपरिषद करण्यासंदर्भात निकाल झाला होता. परंतु त्यावर शासनाकडून अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.
सध्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली प्रभाग रचना चुकीची व अयोग्य असून मतदार यादीत सुद्धा गोंधळ असल्याचा आरोप या बैठकीत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. मागासवर्गीय बहुल अर्थात जास्त मतदार संख्या असलेल्या प्रभागात सर्वसाधारण आरक्षण पडलेले आहे. तर मागासवर्गीय मतदार संख्या अत्यल्प व सर्वसाधारण मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी राखीव संवर्गाचे आरक्षण पडले आहे. हा विरोधाभास असून त्यामुळे त्या-त्या प्रवर्गाच्या उमेदवारांवर अप्रत्यक्ष अन्याय झाल्याची भावना या बैठकीत काही ग्रामस्थांनी बोलून दाखविली आहे.
अनेक प्रभागात मतदारांची अदलाबदल झालेली दिसून येत असून मोठ्या संख्येने बोगस मतदार असल्याची शक्यताही काहींनी वर्तविली.त्याचा शोध घेऊन बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावी ही अनेकांची मागणी आहे. जोपर्यंत शासन शिर्डी नगरपंचायतची शिर्डी नगरपरिषद होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा असून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल करणार नाही अशी भूमिका यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतल्या असून नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद झाल्यानंतर शिर्डी शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अधिकचा निधी मिळेल तसेच नगरसेवक पदांच्या संख्येतही वाढ होईल, त्याचा प्रभागातील विकास साधण्यासाठी सुद्धा फायदा होईल. अनेक नव्या चेहऱ्यांना सुद्धा त्यामुळे संधी मिळेल त्याकरिता सर्वानुमते बहिष्कार टाकून नामनिर्देशन पत्र दाखल न करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती इच्छुक उमेदवार व ग्रामस्थांना देऊन याबाबत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या या बैठकीत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, भाजपचे राजेंद्र गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप, निलेश कोते,नगरसेवक अभय शेळके, कमलाकर कोते, नितीन कोते, दत्तात्रय कोते, सचिन शिंदे, सलीम शेख, मंगेश त्रिभुवन, हरिश्चंद्र कोते, अँड अनिल शेजवळ, अँड अविनाश शेजवळ, पत्रकार राजेंद्र भुजबळ, दत्ता आसणे, राहुल भडांगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

