शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
लोणी काळभोर :-
ग्रीन फाऊंडेशन आधारस्तंभ, साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन श्री.बाळासाहेब कोळपे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जपत लोणी काळभोर कोळपे वस्ती कॅनॉल शेजारी,गोकर्ण,रामफळ,फणस,करंज,नागचाफा,मुचकुंदा,अंजन,अशा 150 प्रकारचे 1001 वृक्ष ऑक्सिजन पॉईट क्र 3 वन विभाग परिसरामध्ये श्री.बाळासाहेब कोळपे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी लोणी काळभोर ग्रा.सदस्य पांडुरंग केसकर, सुभाष विरकर गहिनीनाथ हुमे सर, माने सर , राजाराम पिंगळे, दत्तात्रय चोरमले, हेंमत कोळपे ,धीरज विरकर ,दत्तात्रय शेंडगे,बाबासाहेब यादव, गोरख मोरे, भाऊसाहेब कोळपे, तसेच धनगर समाज संस्था ,गिरीश विभा ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था पुणे, मोठ्या संख्येने महिला पदअधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी बोलतांना ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आधारस्तंभ श्री. बाळासाहेब कोळपे यांनी सांगितले की एक झाड त्यांना किती काय देत असते.
दरवर्षी तब्बल इतक्या लाखो रूपयांचा ऑक्सिजन देते. एक मोठे झाड दररोज २३० लिटर ऑक्सिजन देत असते सिमेंट काँक्रीटच्या वाढत्या वापरामुळे जंगले नाहीशी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे पिंपळ, कडुनिंब, वड आणि तुळशीची झाडे इतरांच्या तुलनेत जास्त ऑक्सिजन देतात. आपल्याला जगायचे असेल तर झाडे लावलीच पाहिजे. सध्याचे ऑक्सिजनचे घटते प्रमाण पाहता झाडांचे महत्त्व लोकांनी वेळेतच ओळखले पाहिजे आणि झाडे लावली पाहिजेत. झाडे दरवर्षी कोट्यावधी रूपयांचे ऑक्सिजन झाडे मोफत देत असते.
ऑक्सिजनचे अर्थशास्त्र जाणून घेतले तर लक्षात येईल एक झाड आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे. सिमेंट काँक्रीटच्या वाढत्या वापरामुळे जंगले नाहीशी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर दिसून येतो. अवेळी येणारा पाऊस, वातावरणातील वाढती उष्णता, हवामानातील प्रचंड बदल हे सगळ आपण अनुभवतच आहोत. हे परिणाम जर भविष्यात कमी करायचे असतील तर आपल्याला झाडेही लावलीच पाहीजे असा संदेश. बाळासाहेब कोळपे यांनी दिली. व सूत्रसंचालन बाबासाहेब यादव यांनी दत्तात्रय शेंडगे यांनी आभार मानले.

