shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरी येथे शहिद बिपिन रावत यांना श्रद्धांजली..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१

वांबोरी येथे शहिद बिपिन रावत यांना श्रद्धांजली..!!

वांबोरी : तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाचे प्रमुख व भारताचे पहिले सिडीएस जनरल बिपिन रावत तसेच अन्य लष्करी कर्मचारी यांच्या हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत निधन झाले त्यानिमित्त राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव पाटील व स्काॅडनलिडर एअर फॉर्सचे के आर कल्हापुरे यांच्या उपस्थितीत वांबोरी येथील शहीद स्मारकामध्ये भारताचे पहिले सिडीएस जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

           यावेळी ॲड. सुभाष पाटील यांनी सांगितले की भारताचे पहिले सिडीएस जनरल बिपिन रावत हे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी भारतीय लष्कराच्या उच्च संरक्षण संघटनांमध्ये अतिशय महत्त्वाचे दूरगामी सुधारणांचा प्रारंभ केला व भारताच्या संयुक्त व चांगल्या प्रकारची सुरक्षा यंत्रणाबाबत बिपिन रावत यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचा आदर्श निश्चितच पुढील युवा पिढीला होईल असे सांगितले व बिपिन रावत तसेच लष्कराचे इतर कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


या कार्यक्रम प्रसंगी स्कॅॉडन लिडर के आर कल्हापुरे, वांबोरीचे सरपंच किरण ससाने, वांबोरी ग्रामपंचायत सदस्य सारंगधर पठारे व परिसरातील गावातील माजी सैनिक यशवंत पवार, कानिफनाथ खंडागळे, जगन दरेकर, सचिन हरिश्चंद्रे, संदीप काळे, देवकर, संतोष पागिरे, विजय कल्हापूर, सोमनाथ मोरे, तसेच वांबोरी ग्रामस्थ ऋषिकेश ढवळेे, मल्हारी शिंदेे, रामदास धनवडे, राऊत बाळासाहेब, प्राध्यापक राधेशाम पठारेे, साहेबराव ठाणगे तसेच सावता माळी युवक संघटना जिल्हाध्यक्ष अशोक तुपेे, विजय कल्हापूरे, संजय नागदे, निलेश ढवळे लक्ष्मण ढवळे, अमोल सत्रे, ईसुफ शेख, रविकिरण पटारे, पाडळे, सर्जराव ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close