प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
जेऊर : १६ / करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊरवाडी येथील विद्यार्थी रुद्रतेज निमगिरे याच्या वाढदिवसानिमित्त गावचे सरपंच अण्णासाहेब निमगिरे यांनी एक झाडाचे रोप भेट म्हणून दिले.
जेऊरवाडी गावचे सरपंच अण्णासाहेब निमगिरे यांनी ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिनी सर्वांना झाडाचे रोप भेट देण्याचा उपक्रम चालू केला आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अण्णासाहेब निमगिरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य अण्णा निमगिरे होते.
या लहानश्या पण प्रेरणादायी कार्यक्रमाची सुरुवात करताना आरोग्य सेविका वंदना गायकवाड , आशा सेविका सुपरवायझर सुवर्णा मोहिते मॅडम आशा सेविका वनिताताई निमगिरे अंगणवाडी मदतनीस निमगिरेताई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊरवाडी चे मुख्याध्यापक किसन कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन येथील प्राथमिक शिक्षक अमोल रणशूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक किसन कांबळे सर यांनी केले.

