दोन महीने उलटून देखील आरोपी मोकाट फिर्यादींना पोलीस संरक्षण दया...
रिपाइं(आठवले) पक्षाची मागणी...
जुन्नर । वार्ताहर : गेली अनेक वर्षापासून पिंपळवंडी येथे वास्तव्यात असलेले तालुक्याचे माजी आमदार रमण दशरथ काकडे यांनी येथील शेतकरी शरद गोपाळ कसबे व इतर यांच्या जमीनीवर दमदाटी करून गेली अनेक वर्षापासून ताबा ठेवला होता.त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेऊन त्यांच्यावर गेली अनेक वर्ष अन्याय अत्याचार करीत होते.
जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.मंदार जावळे यांना पिडीत कुटुंबासह निवेदन देताना संतोषनाना डोळ्स..!
याबाबत कसबे कुटुंबातूनी अन्याय पासून मुक्ती मिळवण्यासाठी राज्याचे समाज कल्याण आयुक्त,पुण्याचे जिल्हाधिकाऱी तसेच पोलीस अधीक्षक यांसकडे लेखी तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्ह्य़ातील तपास अधिकारी मंदार जावळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आळेफाटा पोलीस निरीक्षक यांना दिले.त्यानुसार दिनांक १९/१०/२०२१ रोजी गुन्हा नंबर ०३५१ प्रमाणे रमण दशरथ काकडे,राजू रमण काकडे,राहुल रमण काकडे,आर्यन राजू काकडे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू आरोपी मोकाट फिरत असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे तसेच पिडीत कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी लेखी मागणी रिपाइं (आठवले) या पक्षाचे जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळ्स यांनी पिडीत कुटुंबासह जुन्नर चे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन केली. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येईल असे जावळे साहेब यांनी सांगितले.

