shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार राजमोहंमद शेख यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर..!

श्रीरामपूर ।  प्रतिनिधी :- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य या नामांकित संस्थेचा सन 2021चा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार कोल्हार भगवतीपूर येथीलजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजमोहंमद करीम शेख यांना जाहीर झाला आहे.

          राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजमोहंमद करीम शेख हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. शिव, फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार तसेच अनाथ व निराधार बालकांसाठी ते तारणहार राहिले आहेत तर आजारी रुग्णांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. आजवर त्यांनी हजारो आजारी, निराधार व गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत मिळून देण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे तर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा सदोदित प्रेरणादायी राहिला आहे.

              शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदरमोड करून आधार देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले असल्याने त्यांचे कडे नेहमीच गरजूंचा राबता वाढला आहे.
   
       या त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवरील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ने घेतली असून त्यांच्या या कार्याबद्दल सन 2021 घ्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव सोहळ्यात त्यांना आदर्श कार्यगौरव समाजरत्न देवून सन्मानित करण्यात येणार आहे.20 डिसेंबर रोजी नाशिक येथे पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार राजमोहंमद शेख यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे अकादमी चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विधितज्ञ  कृष्णाजीजगदाळे यांनी शेख यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शेख यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
close