संपादक- सुनिल भोसले
प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी
रॉयल शो चे भव्य दिव्य असे सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची शो चे ऑडिशन रविवार दि.12 डिसेंबर ला पुणे मध्ये आयोजित करण्यात आले आहे असे आयोजक नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मिस.मिसेस असे या ऑडिशन चे स्वरुप आहे.पुणे मध्ये प्रथमच महाराष्ट्रकरांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रॉयल ग्रुप ची असल्याची ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे यांनी सांगितले.पुणे मध्ये प्रथमच मराठमोळा लूक चे सादरीकरण केले जाईल. रॉयल ने पुणे मधील महिला आणि युवतींना एक रॉयल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.या शो मध्ये इंडिया स्टार गौरव पुरस्कार ने विविध व्यक्तींना मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
हा शो जानेवारी मध्ये पुणे मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.या शो साठी सर्व जिल्ह्या मधील युवक आणि युवतींना आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे असे श्रद्धा दराडे यांनी आवाहन केले आहे.ज्यांना या शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 या नंबरवर संपर्क साधावा . रविवार दि.12 डिसेंबर ला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे या शो चे ऑडिशन घेतले जाईल.या शो चे परिक्षक म्हणून सौंदर्यवती विजेती पूनम गोपीनाथ,
सौंदर्यवती किरण शिंदे,सौभाग्यवती विजेती कोमल नांदे, मॉडेल गौरी कदम,क्रांतीज्योती फाउंडेशन च्या अध्यक्षा सोहानी डांगे परिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल भोसले, ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे,श्रद्धा दराडे,युवाक्षी पाटील,रोहन सकपाळ,ज्योती लाड, अरोही ढमढेरे,आकाश रणदिवे,सागर पतंगे,तेजस नाईकवाडी,विजय चव्हाण, मोहिनी धोंगडे, आदिती कदम, रागिणी मोराळे, नमिताताई पाटील, आरती बरसे,उपस्थित राहणार आहे.

