shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे. डाॅ.तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात होणार तालुक्यात महाआरोग्य शिबिर - दत्तात्रय भरणे.

जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना  राष्ट्रीय वयोश्री योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

 डाॅ.तात्याराव लहाने यांच्या  उपस्थितीत जानेवारी महिन्यात होणार तालुक्यात महाआरोग्य शिबिर -  दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी  प्रयत्न करीत असून गरजेनुसार मोफत साहित्य वाटप केले जाणार आहे. तसेच गरजुंच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.  इंदापूर तालुक्यात या योजनेचा जास्तीतजास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या असून गावोगावच्या कार्यकर्त्यांना याविषयी सुचना दिल्या आहेत. त्यामुळे साठ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून त्यांच्या चेहऱ्यावर निश्चितपणे आनंद दिसणार आहे असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे पूर्व तपासणी शिबिर (दि.९)आयोजित करण्यात आले होते. या उद्धाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना व अपंगांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मिळणारे साहित्य येत्या दोन महिन्यात घरपोच केले जाईल.त्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. 
 खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खा. सुप्रिया सुळे आणि ना. दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना व अपंगांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी गुरूवारी दि.०९ डिसेंबर रोजी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पूर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.याचे उद्धाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

येत्या जानेवारी महिन्यात तालुक्यात महाआरोग्य शिबिर पद्मश्री जेष्ठ नेत्र रोग तज्ञ डाॅ.तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या मध्ये डोळ्यांचे शिबिर देखील घेण्यात येणार आहे.यासाठी सर्वजन मेहनत घेत असून निश्चितपणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले,की राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधणे यांच्या मोफत वाटपासाठी संपूर्ण जिल्ह्यात पूर्व तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करतो.


 
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले,पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ, इंदापूर युवक शहराध्यक्ष इम्रान शेख,अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष अहेमदरजा सय्यद,सोशल मिडिया अध्यक्ष हामा पाटील,गफुर सय्यद,डाॅ.सुहास शेळके,महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, महिला युवती अध्यक्षा अश्विनीताई कुरडे- राऊत,शहराध्यक्षा उमा इंगोले यांसह राष्ट्रवादी काँग्रेचे सर्व आजी माजी नगरसेवक,आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close