१८ व १९ डिसेंबर रोजी इंदापूर तालुका प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन.
विजेत्यांना फिरता चषक प्रदान करण्यात येणार.
इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील कार्यरत विविध आस्थापनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन निश्चित करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या तारखेत बदल करण्यात येत आहे. त्यानुसार इंदापूर तालुका क्रिकेट व हॉलीबॉल प्रशासकीय चषक स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ व १९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता क्रीडा संकुल सरस्वतीनगर इंदापूर येथे करण्यात येणार असून विजेत्यांना फिरता चषक प्रदान करण्यात येणार आहे.
विविध आस्थापनातील क्रिकेट व हॉलीबॉल चे संघ स्पर्धेकरिता तयार करून तालुका क्रीडा कार्यालय इंदापूर येथे दिनांक १६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत कळवण्यात यावे असे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी पत्रकाद्वारे माहिती देऊन केले आहे.

