इंदापूर तालुक्यात निवडणूक काळात नियमाचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर.
इंदापूर प्रतिनिधी : इंदापूर तालुक्यात मध्ये येणाऱ्या काळात विविध निवडणुका होणार असून निवडणूकीत नियमाचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा सूचक इशारा
इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत दि. ९ डिसेंबर रोजी शहा सांस्कृतिक भवन मध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी येथील इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिला.
. यावेळी इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, बिट अंमलदार, पोलीस पाटील, महिला दक्षता कमिटीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी तक्रारदारांच्या सूचना निवारण करण्यासाठी सर्वांनी योग्य काळजी घ्यावी अश्या सूचना त्यांनी दिल्या.श्री. मुजावर पुढे म्हणाले,इंदापूर तालुक्यात सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकनिवडणूकीची रणधुमाळी सुरू असून आगामी काळात नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणूका होणार आहेत. निवडणूक कालावधीत गुन्हे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे यांनी गावागावांतील बँक, सराफकट्टा यांची सुरक्षा, महिला व शिक्षण घेणाऱ्या मुली विषयी होणारे अपराध व त्याविषयी घ्यावयाची दक्षता तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी गावागावात शांतता व सलोखा, कोरोना महामारीचे निर्बंध यासंदर्भात मार्गदर्शन केले.
सुत्रसंचलन पवन भोईटे यांनी केले.

