shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुन्हा एकदा अग्नितांडव सनफार्मा कंपनीला भीषण आग एक जणाचा होरपळून मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१      
 
पुन्हा एकदा अग्नितांडव सनफार्मा कंपनीला भीषण आग एक जणाचा होरपळून मृत्यू..!!
अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे असे समजते. 

अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे असे समजते. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व अहमदनगर महानगरपालिकाच्या चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान, कंपनीतील कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून यामध्ये जिवीतहानी झाली .आग लागलेल्या ठिकाणी मृतदेह मिळाला आहे  . यासह किती नुकसान झाले याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.

नागापूर एमआयडीसीत सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅन्ट असून आतील एका प्लॅन्टला बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आग लागली. याची माहिती एमआयडीसी, अहमदनगर महानगरपालिकेला मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. व्हक्युम पंप फुटल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते. दरम्यान आगी बाबत माहिती देण्यास कंपनी व्यवस्थापनाने नकार दिला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close