shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वीज पुरवठा तोडल्यास 14 डिसेंबरला गोदावरी नदीपात्रात जलसमाधी : शेतकरी संघटनेने दिला इशारा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१
 
वीज पुरवठा तोडल्यास 14 डिसेंबरला गोदावरी नदीपात्रात जलसमाधी : शेतकरी संघटनेने दिला इशारा..!!

श्रीरामपूर : महावितरण कंपनीने दहा दिवसांपासून तालुक्यातील शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. शेतकर्‍यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा 14 डिसेंबरला महांकाळवाडगाव येथील शेतकरी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतील, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते निलेश शेडगे व इतरांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, महावितरण कंपनीने शेतकर्‍यांना 24 तास वीजपुरवठा देण्याचा निर्णय 2012 मध्ये घेतला होता. सरकारने शेतकर्‍यांच्या बिलाचे सोळा तास वीजपुरवठ्याचे पैसे महावितरण कंपनीकडे तेव्हापासून जमा केले आहे. चालू वर्षाचे पैसेही महावितरण कंपनीला सरकारकडून मिळालेले आहेत.


मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे महावितरण कंपनीला वीजबिलाचे पैसे देणे लागत नाही. शेतकर्‍यांनी मागणी केलेल्या बिलाचा सर्व हिशेब देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तोडण्यात आलेला वीजपुरवठा तातडीने जोडून द्यावा, अन्यथा सर्व शेतकरी जलसमाधी घेतील, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर संदीप आदिक, बाळासाहेब घोगरे, अण्णासाहेब जाधव, गोरख जाधव, विठ्ठल जाधव, सद्दाम शेख, प्रकाश जाधव, गोटीराम जाधव, अण्णासाहेब आढाव, जितेंद्र शहा आदींच्या सह्या आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close