शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक ०९ डिसेंबर २०२१
परदेशातून जिल्ह्यात आलेल्या 25 जणांचा अहवाल निगेटिव्ह,शिर्डीतील दोघांचा शोध सुरू: 94 अहवालाची प्रतिक्षा..!!
अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी आणखी 39 आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल झाले आहेत. ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या सर्व प्रवाशांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 121 प्रवाशी आले असून त्यातील शिर्डीच्या दोघांचा शोध लागलेला नाही. आतापर्यंत 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 94 अहवालांची प्रतिक्षा आहे.
कोविडच्या नवीन ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात 3 तारखेला 15, 5 तारखेला 12, 7 तारखेला 55 आणि काल 39 प्रवाशी आंतरराष्ट्रीय प्रवास करून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यातील 119 प्रवाशांचा शोध लागला आहे. त्यांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आतापर्यंत पाठविलेल्या नमुन्यापैकी 25 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 94 अहवालाची प्रतिक्षा असून दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘या’ ठिकाणी आले प्रवासी
नगर शहर 16, संगरमनेर 7, पाथर्डी 5, नेवासा 4, राहुरी 3, श्रीरामपूर, कोपरगाव, नगर तालुका आणि पारनेरमध्ये प्रत्येक एक जण आला आहे. या प्रवाशांना पुढील सात ते 14 दिवसासाठी विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

