shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मॅग्नोलियाज कंपनीने बनविला 76 किलो चा केक..!

पुणे- फुलगाव येथील लोकसेवा शैक्षणिक संकुल लोकसेवा परिवारातील जेष्ठ सदस्य श्री. प्रकाश पवार ,श्री.भाऊ काठवते, एव्हरेस्टविर श्री.श्रीहरी तापकीर यांचा वाढदिवस अत्यंत अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभ हस्ते केक कापण्यात आला. ७६ किलोग्राम वजनाचा आणि ७ x४ फूट रुंदीचा दोन मजली केक वाढदिवसानिमित्त तयार करण्यात आला होता .असा अतिभव्य, सुंदर सजावट , अत्यंत चविष्ट आणि स्वादिष्ट असणारा केक मॅग्नोलियाज कंपनीने बनवला होता.या वेळी 
 संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व केक  वाटण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी  श्रीनगर येथे कार्यरत असणारे मेजर अभिजित गोसावी,सागर माथा ट्रेकर्स चे पांडुरंग शिंदे,उद्योजक विनोद राठी,लोकसेवा प्रतिष्ठांनचे संस्थापक अध्यक्ष श्री.मा.आमदार दीपक भाऊ पायगुडे,फाईव्ह स्टार फूड व्हेंचर - मॅग्नोलियाज् ब्रँडचे सर्व डायरेक्टर्स बाळासाहेब कोळपे, संभाजी भोसले,मोहसीन महाजन व सुजित लहारे हे उपस्थित होते.  लोकसेवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नरहरी पाटील, श्री सुहास निकम,क्रिडा प्रशिक्षक राजीव देव ,लोकसेवा परिवाराचे किशोर लगड, उमेश खिस्ते, गणेश शाह ,अर्जुन शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा मांढरे यांनी केले.संयोजन भारत पवार, सुरेश पाटील,विकास तिरकुंडे ,पांडुरंग जगताप,तुषार वाघमारे ,विजय तांबे यांनी केले.कार्यक्रमास संकुलातील शिक्षक ,कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.प्रस्तुत कार्यक्रमात ७६ किलोचा हा केक विशेष आकर्षण ठरला.
close