प्रहार अपंग क्रांती संस्था इंदापूर तालुका व शहर यांच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर येथे व्यंकटेशनगर मंदिर या ठिकाणी प्रहार अपंग क्रांती संस्था इंदापूर तालुका व शहर यांच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त गौरव पुरस्कार सोहळा संपन्न करण्यात आला.
यामध्ये कोरोना काळात दिव्यांग बांधवांना ऑनलाइन कागदपत्र तसेच आयडी कार्ड व वैद्यकीय सेवा इत्यादीसाठी मोफत सेवा सुविधा दिल्याबद्दल ज्यांनी मदत केली त्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे होते.
यावेळी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सिताब, आमचे मेंबर मित्र परिवाराचे अनिल पवार, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटोळे ,इंदापूर तालुका अध्यक्ष आनंदराव गायकवाड, इंदापूर शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी, दादासाहेब पाटोळे उपाध्यक्ष इंदापूर शहर
या मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर राजापुरे, अंकुश ब्रदर्स ,रामदास पवार , नवनाथ कचरे, आशिष नायकुडे, स्वप्नील शिंदे ,रामदास पवार, राहुल जाधव, सोमनाथ घोगरे यांना सन्मान चिन्ह म्हणून ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले की, दिव्यांगाना मोफत काठी, व्हीलचेअर मोटारसायकल इत्यादी साहित्य त्यांना मिळवून देण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, आशा वर्कर व इतर सामाजिक संघटना यांची मदत घेऊन दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची त्यांनी माहिती दिली .
तसेच ते पुढे म्हणाले की, दिव्यांगासाठी जेवढा शासकीय योजना पंचायत समिती स्तरावर, नगरपालिका स्तरावर आहेत. या योजना संदर्भात अलीकडे याचा विचार होऊ लागला आहे. यासंदर्भात विचारणा होऊ लागल्या आहेत. अधिकारी वर्गाकडून आपणाला जी माहिती दिली जाते त्या माहितीची पडताळणी करून त्यासंदर्भात सदर अधिकाऱ्यांना प्रश्न करायला पाहिजे. त्याच वेळीच दिव्यांगाची व इतरांची प्रगती होईल अन्यथा प्रगती होत नसते. त्यामुळे जागरूक नागरिक तयार करणं , जागरूक दिव्यांग तयार होणं हे खूप महत्त्वाचे आहे. जनतेने जागरूक होणे गरजेचे आहे. माझे मत आहे की, लोकप्रतिनिधींना लोकशाहीमध्ये वेगळेच महत्व आहे. कारण आपली व्यवस्था अशी चालते.
कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था अशा तिघांनी मिळुन आपला देश चालू असतो. असे मत त्यांनी या कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.
इंदापूर शहरात महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करीत जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

