shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पलंगाच्या बॉक्स मध्ये ठेवलेले शिक्षकाचे ३२ तोळे सोने गायब : केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..!!



----------------------------------------------------
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी :-  केज तालुक्यातील नांदूरघाट येथील एका शिक्षकांच्या घरी ३२ तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे.





या बाबतची माहीती अशी की, नांदूरघाट ता. केज येथील शिक्षक विकास किसनराव ढाकणे वय (५१ वर्ष) यांनी त्यांच्या घरातील पलंगाच्या बॉक्स मध्ये ठेवलेले ३२ तोळे सोन्याचे दागिने हे १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान चोरीला गेले. या ३२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत ही सुमारे १२ लाख४६ हजार रु. एकढी आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी त्यानी पलंगाचा बॉक्स उघडून पहिला असता त्यात दागिने आढळून आले नाहीत. त्या नंतर त्यांनी घरात विचारपूस करून शोध घेतला. परंतु दागिने सापडले नाहीत. म्हणून त्यांनी दि. २ डिसेंबर गुरुवार रोजी केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु.र.नं. ५६९/२०२१ नुसार भा.दं.वि. ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
close