गोखळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पदी बाळासाहेब चितळकर तर व्हाइस चेअरमनपदी सदाशिव वाघमोडे यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली यामध्ये १३ जागेवरती १३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे सदर सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. आज दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जे.पी. गावडे यांच्या उपस्थितीमध्ये चेअरमन पदी बाळासाहेब सोपान चितळकर तर व्हाईस चेअरमन पदी सदाशिव गेना वाघमोडे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी सोसायटीचे संचालक तुकाराम करे, सौ अनिता कांतीलाल झगडे,सौ शकुंतला खिलारे, जयवंत खरात, संभाजी शिंडे, सौ.सुमन गोफने, जालिंदर गोफने, प्रशांत झगडे, कांताबाई फरतडे, गेनदेव तरंगे, सौ. अनुसया झगडे, अशोक अभंग, व सचिव युनूस शेख उपस्थित होते.
यावेळी सोसायटीचे सर्व नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या समारंभावेळी शशिकांत तरंगे, लक्ष्मण हरणावळ गुरुजी, कांतीलाल झगडे ,माऊली वाघमोडे ,अंकुश वाघमोडे, बजरंग राऊत, राजाराम तरंगे, महादेव वाघमोडे ,भानुदास चितळकर, माहरनवर गुरुजी, सचिन तरंगे, लेमण गावडे ,राघु पारेकर, अण्णा तरंगे, सुहास बुटे, कांता तरंगे इत्यादी उपस्थित होते.

