shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज अचानक शिर्डीतील साई मंदिरात हजेरी लावून साईबाबांचे घेतले दर्शन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १३ डिसेंबर २०२१ 

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज अचानक शिर्डीतील साई मंदिरात हजेरी लावून साईबाबांचे घेतले दर्शन..!!

परिवहन मंत्री अनिल परब साई बाबांच्या दर्शनासाठी आज अचानक शिर्डीत

शिर्डी : राज्यातील एसटी कामगारांच्या संपामुळं चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले व विरोधकांच्या टीकेचा सामना करणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज अचानक शिर्डीतील साई मंदिरात हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले.
तसेच, आरतीही केली. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर परतावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी साई चरणी केली.गेल्या महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.हे सगळं सुरू असतानाच अनिल परब यांनी आज अचानक

शिर्डीत साई दरबारी मध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचं स्वागत केलं. शिर्डी नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं जिल्हा माहिती कार्यालय, तसेच अनेक शिवसेना


 
पदाधिकाऱ्यांना परब यांच्या शिर्डी दौऱ्याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. साई दर्शनानंतर साई मंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक दोन मधून बाहेर येत असताना मीडियाच्या प्रतिनिधींनी परब यांना गराडा घातला व संपाबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

परब यांनी कुठलेही राजकीय भाष्य करण्याचे टाळले. मी नेहमी साई दर्शनाला येतो. आंदोलन मागे घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे, अशी प्रार्थना साई चरणी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close