shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोथरे सोसायटीच्या चेअरमनपदी माजी आमदार जगताप गटाचे आबासाहेब शिंदे


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

    करमाळा: दि. १३/ करमाळा तालुका पोथरे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे आबासाहेब नवनाथ शिंदे यांची व व्हाईस चेअरमन पदी आ संजयमामा शिंदे गटाचे दत्तात्रय देवराव आढाव यांची बिनविरोध निवड झाली . 

पोथरे सोसायटीची नुकतीच बिनविरोध निवडणूक झाली होती आज चेअरमन , व्हा चेअरमन निवडीसाठी शिंदे व आढाव यांचेच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुक बिनविरोध करणेसाठी सोसायटीच्या नवनिर्वाचित १३ पैकी आबासाहेब शिंदे, दत्तात्रय आढाव,शांताबाई झिंजाडे, छगन शिंदे, मच्छिंद्र दळवी, पंडीत भांड, नितीन साळुंके, देविदास जाधव, जया झिंजाडे, संतोष वाळुंजकर, किसन झिंजाडे या ११ सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला . निवडीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिंदे व आढाव यांचा सत्कार केला.
   
    यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांसह शहाजी झिंजाडे,पै . सुरेश शिंदे, जयद्रथ शिंदे, इब्राहीम शेख, बापुराव गोसावी यांचेसह माजी आमदार जगताप व आ .शिंदे गटाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. नूतन चेअरमन शिंदे व व्हा चेअरमन आढाव यांचे आ . संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अभिनंदन केले आहे .
close