डाळज नं. २ येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती डाळज नंबर २ तालुका इंदापूर या ठिकाणी इंदापूर तालुका समस्त वंजारी समाज बांधव यांच्या वतीने डाळज नंबर २ मधील समाजबांधव यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.१२) रोजी संपन्न झाली.
भविष्यात मुंडे साहेबांचं समाज संघटनेचे असलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मानस समाजातील समाजबांधवांनी यावेळी अमलात आणण्याचे ठरवले. विविध मान्यवरांची मनोगते झाली. यावेळी प्रतिमा ची पूजन व मनोगत दैवत फाउंडेशनचे अध्यक्ष भैय्यासाहेब पानसरे यांनी केले . मान्यवर म्हणून निमसाखर ग्रामपंचायतचे सदस्य व पुणे जिल्हा वंजारी सेवा संघाचे संपर्कप्रमुख शेखर पानसरे उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, साहेबांनी दिलेला मंत्र समाजाच्या विविध प्रश्नावर ते समाज बांधव एकत्र येण्याचा मानस यावेळी यांनी व्यक्त केला.
तसेच यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष दीपक खाडे कळस गावचे चे विकास दराडे व ओमकार ओमासे श्री.नानासो डोईफोडे,श्री.भगवान कदम ( मा.उपसरपंच)प्रदिप जगताप (सरपंच) संजय कुचेकर, गणेश पानसरे, सतिश पानसरे, अभिजित पानसरे, रामभाऊ सोंन्ने, विशाल जगताप,श्री. प्रमोद पानसरे,श्री.राजुभाऊ डोईफोडे, प्रविन डोईफोडे,किसन डोईफोडे, सुदाम पानसरे, दत्ता सोंन्ने, कुमार पानसरे, विकास आढाव, अभिजित मदने व समाजातील इतर बांधव उपस्थित होते. अशी माहिती हिरालाल पानसरे यांनी दिली.

