डॉ.अक्षय ठरले दोन सुवर्णपदकांचे मानकरी
श्रीरामपूर (शौकतभाई शेख):-
येथील प्रथितयश हृदयरोग तज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाठ यांचे चिरंजीव डॉक्टर अक्षय शिरसाठ यांनी एम. डी. मेडीसिन मध्ये उच्चतम गुण संपादन करून दोन सुवर्णपदके पटकाविले त्याबद्दल डॉक्टर अक्षय दिलीप शिरसाठ यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते सन्मानपत्र व दोन सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.
एकाच वेळी दोन सुवर्णपदके मिळवलेले डॉ.अक्षय शिरसाठ हे एकमेव डॉक्टर असून हा श्रीरामपूरचा मोठा गौरव असल्याचे त्यांचे वडील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाठ यांनी सांगितले,
डॉक्टर अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेवियर इंग्लिश स्कूल श्रीरामपूर येथे तर, महाविद्यालयीन शिक्षण एस. पी. कॉलेज पुणे आणि वैद्यकीय शिक्षण सरकारी कॉलेज मिरज व पदव्युत्तर शिक्षण कृष्णा इन्स्टिट्युट कराड येथे झाले आहे,
कृष्णा इन्स्टिट्युट कराड येथे झालेल्या पदव्युत्तर पदवीदान समारंभात डॉक्टर अक्षय शिरसाठ यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर दिलीप शिरसाठ व त्यांचे संपूर्ण कुटुंब वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेली पस्तीस वर्षांपासून उत्तम सेवा देत आहेत, कोरोना महामारी काळात या परिवाराने जनतेच्या सुरक्षेसाठी अतोनात परिश्रम घेऊन रुग्णांचे प्राण वाचविले,आमच्या या प्रामाणिक कार्याची ही पावतीच असल्याचे डॉ.अक्षय यांनी सांगितले. आपल्या पित्याच्याच सेवेचा वसा घेऊन डॉ.अक्षय यांनी श्रीरामपूर शहरात आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला असून हृदयाच्या सर्व महत्त्वाच्या तपासणीची अद्यावत मशीन यंत्रणा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
माझ्या यशामध्ये माझे माता - पिता डॉ.दिलीप शिरसाठ, डॉ.वर्षाताई शिरसाठ यांचा आशीर्वाद व मोलाचा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.त्यांना डॉ.वी.सी.पाटील, डॉ. औदुंबर, डॉ.मकरंद माने, डॉ.शिल्पा पाटील, डॉ.रसाळ आदी गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.डॉ. दिलीप शिरसाठ हे इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मार्गदर्शक तर डॉ.अक्षय शिरसाठ हे आजीव सभासद आहेत.
डॉ.अक्षय यांचे यशाचे रेड क्रॉस चेअरमन तथा प्रांताधिकारी अनिल पवार, व्हाईस चेअरमन तथा तहसीलदार प्रशांत पाटील, सचिव सुनील साळवे, समन्वयक डॉ.बाळासाहेब सोनटक्के, प्रवीण साळवे,पोपटराव शेळके, प्रमोद पत्की, भरत कुंकुळोल, चंद्रकांत परदेशी, नितीन राऊत, संजय टेकाळे, पुष्पा शिंदे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, राजेंद्र केदारी, नानासाहेब मुठे, सोपान नन्नवरे, कांतीलाल शिंदे, प्रेमनाथ सोनुने, श्रावण भोसले, मोहमद शेख, सुनील शेळके, महेंद्र काळंगे आदींसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, वकील आदींनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीरामपूर - येथील डॉक्टर अक्षय दिलीप शिरसाठ यांनी पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्रात उच्चतम गुण संपादन करून दोन सुवर्णपदके पटकविली त्यानिमित्ताने डॉ. अक्षय यांचा सन्मान करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तथा इतर मान्यवर.

