shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्याची धाकधूक वाढली ; ओमीक्राॅन रुग्णांच्या संख्येत आणखी भर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०७ डिसेंबर २०२१ 
 
मुंबई : करोना संकटाचा यशस्वी सामना करणार्‍या महाराष्ट्राला ‘ओमायक्रॉन’च्या नव्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. काल ‘ओमायक्रॉन’पॉझिटिव्ह 7 नवे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत.
डोंबिवलीपाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यापैकी 6 जण पिंपरी-चिंचवडचे तर एक जण पुण्यातील आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या 8 वर पोहोचली आहे.
राज्याची चिंता वाढणारी ही बाब आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियातील लेगॉस शहरातून भावाला भेटायला आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबतच्या दोन मुली आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ व त्याच्या दोन्ही मुली असे 6 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांच्या अहवालात ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने म्हटले आहे.पुण्यातील 47 वर्षीय पुरुषालादेखील ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close