shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डाॅ.सुखदेव तुकाराम धोत्रे सर यांचा आज होत आहे सेवापुर्ती सन्मान सोहळा..!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
ठाणे : सामाजिक योगदान असणार्या व ठाणे येथील शासकीय तंत्रनिकेतन,ठाणे येथे कार्यरत असलेल्या व स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख पद हे निर्विघ्न पार पाडलेल्या सन्मानिय डाॅ.एस.टी.धोत्रे यांचा दि.१ डिसेंबर २०२१ रोजी सेवापुर्ती सोहळा शासकीय तंत्रनिकेतन,ठाणे या कार्यालयाच्या वतीने तेथील प्राचार्य यांनी आयोजित केले आहे.  


सन्मानिय एस .टी.धोत्रे सर यांनी सामाजिक भान राखत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, गरिबांना न्यायाची भूमिका, नोकरीत असताना गरीब, भटक्या- विमुक्त,दीन- दलितांना,आदीवासी समाजाला न्याय व मार्गदर्शन करण्यासाठी कुठलीही तमा न बाळगता आपल्या सेवाकार्यात सेवा देतांना त्यांनी दुसर्यांच्या सुख- दुःखात आपणांस सामावून घेऊन वेळोवेळी इतरांना न्याय देण्याचा सचोटीने प्रयत्न केला.अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन अनेकांचे प्रपंच फुलविले.अनेक विद्यार्थी आज मोठ- मोठ्या पदावर विराजमान आहेत. सगळीकडे धोत्रे सरांचा गवगवा होत आहे.  त्यांच्या दैदिप्यमान कामगिरी मुळेच समाजामध्ये त्यांची मान- प्रतिष्ठा उंचावली आहे. 

डाॅ.एस टी.धोत्रे सरांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर सेवाकार्यात अगदी सलोख्याचे संबंध दृढ केल्यामुळे सहकार्यांनी सेवापुर्ती सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन केले आहे. असा सोहळा ज्यांनी सेवा कार्यात सहकार्याना अनमोल सहकार्य केलेले असते अशा लाखमोलाच्या एखाद्याच्याच नशिबी असते.

अशा महान कार्य पार पाडलेल्या डाॅ.एस.टी.धोत्रे सरांना सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 
तसेच वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष-राकेशजी विटकर, सरचिटणीस दिलीपजी गुंजाळ, प्रदेश सचिव- रमेश जेठे सर यांनी देखील धोत्रे सरांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
close