shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गावठी कट्टा व तलवार बाळगणार्‍या दोघांना श्रीरामपूर शहर पोलिसांकडून अटक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ 
      
 गावठी कट्टा व तलवार बाळगणार्‍या दोघांना श्रीरामपूर शहर पोलिसांकडून अटक..!!


श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी गोंधवणी रोड, वार्ड नंबर एक भागातील पेट्रोल पंपासमोर हातात तलवार घेऊन आरडा-ओरडा करणाऱ्या इरफान मोउद्दीन सय्यद ,वय 19 वर्ष,राहणार- मिल्लत नगर, श्रीरामपूर याला अटक करून त्याच्यावर पोलीस शिपाई नरवाडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरातील सुलताननगर भागातून काल रात्री जोएब अन्सार शेख,वय 28,राहणार -काझीबाबा रोड वॉर्ड नंबर 2,श्रीरामपूर याला देशी कट्टा व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले.याप्रकरणी पोलीस नाईक गोसावी यांनी भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे तक्रार दिली आहे.

       या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरची दमदार कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे ,डीवायएसपी श्री.संदीप मिटके ,श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांकडून करण्यात आली.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close