shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळा उजव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडावे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ 

मुळा उजव्या कालव्यातून लवकरात लवकर आवर्तन सोडावे..!!

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी,नेवासा तालुक्यातील काही भागात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज असून मुळा कालव्यातून लवकर आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

       सध्या रब्बीतील गहु हरभरा तुर, मका, ऊस, कांदा या पिकांना सध्याच पाण्याची गरज आहे. अनेकांच्या विहीर, कुपनलिकांची पाणीपातळी खालावली असून शेतकर्‍यांची पिके सध्या जोमदार आहेत.

 
     मात्र पिकांना वेळीच पाणी मिळाले नाही तर पिके जळून खाक होऊन जाण्याची भिती निर्माण झाली आहे. यावर्षी रब्बी पिकांना हवामानातील वातावरण अनूकुल आहे. अनेकांची पिके जोमदार आहे. मात्र पाटपाणी जर उशिरा आले तर मात्र पिकांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. यावर्षी खरीप पिकांची अस्मानी संकटाने पार दयनीय अवस्था करून टाकली होती.खरिपाची वाट लागल्याने आधीच शेतकरी हवालदिल झाले आहे. अर्थिकदृष्टया शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.


 
         त्यामुळे आता शेतकर्‍यांना रब्बी पिकांतून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. मात्र विहिर व कुपनलिका यांची पाणीपातळी खालावली असल्याने पुन्हा चिंतेचे ढग दाटुन येऊ लागले आहे. शेती पिकांना लवकर पाणी मिळाले नाही तर पिके जळून जातील व शेतकर्‍यांचे अर्थिक नुकसान होवून पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर मुळातून उजव्या कालव्याला आवर्तन सोडून शेती पिके व शेतकर्‍यांनाही वाचवा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close