shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यपदी खडांबे खुर्द येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती लटके यांची निवड..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक १२ डिसेंबर २०२१  

रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यपदी खडांबे खुर्द येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती लटके यांची निवड..!!


राहुरी : रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यपदी खडांबे खुर्द येथील राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान ज्येष्ठ सदस्य श्री. बाळासाहेब सोमनाथ लटके यांची नुकतीच निवड झाली.

उपसभापती बाळासाहेब लटके नादार तनपुरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत आहेत.
पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवून, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणे, गोरगरिबांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे आदी प्रश्नासंदर्भात सदैव प्रयत्नशील असतात.दरम्यान त्यांच्यावर आणखी जबाबदारी रोजगार हमी योजना समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

परिसरातील सर्वांना बरोबर घेऊन या सदस्य पदाच्या माध्यमातून काम करणार असल्याची माहिती याप्रसंगी माजी उपसभापती बाळासाहेब लटके यांनी दिली.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close