प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
वर्तमान काळात आज देखील प्रेताला दफन करण्यासाठी आदिवासी पारधी कुटुंबातील भावांना आज गावो गावी रानोमाळ भटकंती करावे लागते. हे आजच्या स्वातंत्र्यात चिंताजनक बाब आहे.
सारे आयुष्य ऊघड्यावर जीवनासी संघर्ष करतांना अखेर श्र्वासाने शरीराची साथ सोडली,या स्वार्थी जगाचा निरोप घेताना,प्रेताला जागा मिळवण्यासाठी वण वण भटकंती करावी लागली...हे आता कुठवर चालणार..?
भारत स्वतंत्र होऊन पाऊणशे वर्षे झाले हे पाडे वाचुन वाचुन डोळे मिटून गेले परंतू आदिवासी पारधी बांधवांना मृत झाल्यानंतर प्रेत दफन करण्याकरता रानोमाळ खेडोपाडी नदी जंगल काठी वणवण भटकंती करून प्रेताचे दफन करावे लागते, राज्य देश हे स्वातंत्र्य होण्याचे पाढे वाचतो,परंतु गरीबीत होरपळलेला देश या देशातील गरीबांचा प्रश्न या विषयावर शासन व प्रशासन कांम करण्यास तयार नाही हे चिंताजनक बाब आहे,
आज देखील दोन घास मिळवण्याकरता आदिवासींना वणवण भटकंती करावे लागते आदिवासी पारधी बांधवांना शासनाच्या हजारो योजना कागदावरच आहेत, गाव व्यवस्थेत आलेल्या शासकीय योजना ह्या गाव पुढार्यांच्या नातेवाईकांना पुरवल्या जातात परंतु आदिवासी पाड्यांवर पोचवल्या जात नाही..हे सर्व दुखद आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांची परिस्थिती आज देशामध्ये चिंताजनक देशातील हजारो आदिवासींच्या डोक्यावर दुःखांचा डोंगर आहे,तेवडे दु:ख डोक्यावर घेऊन आनंदाने जिवन गुजारन करणारे पारधी मृत्यू झाल्यानंतर संघर्ष करावे लागते, प्रेताला जागा देताका जागा...आहो जिवंतपणे सोडाच परंतू मृत्यू झाल्यानंतर तरी आम्हाला प्रेताला तरी जागा द्या..
आज पर्यंत शेवराई सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून विविध विषयांवर काम करत असताना आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले.यांनी महाराष्ट्राच्या कान्हा कोप-यात 2हजार 688आदिवासी समाजातील गरीब लोकांच्या प्रेताला संघर्ष करुन हक्काची जागा मिळवून दिली.देशातील व राज्यातील लाखो आदिवासी पिढीतांचे आसू पुसण्यासाठी आत्ता तरी शासन जागे होइल का ?...

