shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा तर्फे स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

प्रतिनिधी : सुर्यकांत होनप

करमाळा : १२ /   भाजपा तर्फे आज १२  डिसेंबर रोजी स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे आणि शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या हस्ते मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुंडे साहेबांनी आजपर्यंत तळागाळातील सोषित वंचित समजला नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्त्यांचा त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या पाठीवर आपुलकीची थाप मारली राज्याच्या राजकारणात अनेक नेते त्यांनी घडविले असे उद्गार भाजपा माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे यांनी व्यक्त केले.
त्यांनतर भारताचे प्रथम CDS स्व. बिपीन रावत आणि करमाळा भाजपा चे माजी तालुकाध्यक्ष आनंदराव पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण,घनशाम गांधी,महेश परदेशी,व्यापार आघाडी चे जितेश कटारिया,संजय गांधी योजनेचे नरेंद्र ठाकूर,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,योगेश सोराटे, शहर सरचिटणीस मुन्ना हसिजा,युवा मोर्चा चे मयूर देवी,नागरिक संघटनेचे फारुख जमादार,शिवसेनेचे संजय शिंदे,महिला शहराध्यक्ष संगिता ताई नश्टे,राजश्री ताई खाडे,सुहास ओहोळ,प्रदीप देवी,पंकज सोळंकी,वैभव आहेर,लखन चिरके,संजय जमदाडे,सुजित दोशी,संजय परदेशी,सतीश शिंगाडे,महादेव गोसावी,अजित जगते आदी मान्यवर उपस्थित होते.
close