shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी खासदार तनपुरे यांनी कमी कालावधीमध्ये या पुलाचा प्रश्न मार्गी लावला- रविंद्र आढाव..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१ 

माजी खासदार तनपुरे यांनी कमी कालावधीमध्ये या पुलाचा प्रश्न मार्गी लावला- रविंद्र आढाव..!!


राहुरी : कमीत-कमी कालावधीमध्ये मानोरी-केंदळ या पुलाचा प्रश्न मार्गी लागला तो केवळ माजी खासदार प्रसादरावजी तनपुुरे यांच्यामुळे कारण त्यांनी सातत्याने हा पाठपुरावा केला म्हणून आपण आज हे काम सुरू करू शकलो. त्यामुळे या कामाचे श्रेय सर्वश्री तनपुरे आहे. तर मानोरी गावासाठी ना.प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल पाच कोटी रूपयांची विकास कामे झाली आहेत. यामध्ये मानोरी-खिळे वस्ती रस्ता, मानोरी-गणपतवाडी रस्ता रस्ता, मानोरी-आरडगाव शिवरस्ता, मानोरी-ठुबे वस्ती रस्ता तसेच विविध ठिकाणी ट्रान्सफार्मर तर आता पुलासाठी हा निधी प्राप्त होऊन ह्या विकास कामांची घौडदौड सुरू असल्याचे गौरवोद्गार रविंद्र आढाव यांनी काढले आहे ते मानोरी येथे बोलत होते.
मानोरी २४ लक्ष ४६ हजार रूपये अंदाजापञे असलेल्या मानोरी-केंदळ बंधा-याच्या लगतच्या पुलाच्या कामाचा भुमीपुजन कार्यक्रम समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते रविंद्र आढाव हे होते. ते बोलताना पुढे म्हणाले की, मी भागातुन काम करताना कुठलाही गट-तट किंवा पक्ष न बघता सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रसादरावजी तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

 

प्रसंगी व्यासपीठावर मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी उप अभियंता आण्णासाहेब आंधळे, शाखा अधिकारी शरद कांबळे, सरपंच आब्बासभाई शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, महाराष्ट्र विद्युत महामंडळ समितीचे सदस्य डाॅ.राजेंद्र बानकर, पंचायत समिती सदस्य सुरेश निमसे, गोकुळदास आढाव, ह. भ. प. संभुगिरी महाराज गोसावी, नवाज देशमुख, बाळासाहेब आढाव, विकास मगर, संजय पोटे, आप्पासाहेब जाधव, साहेबराव गुंजाळ होते.

 

तर कार्यक्रमास अक्षय नागवडे, बाळासाहेब खुळे, बाळुकाका वाघ, डाॅ.राजेंद्र पोटे, ॲड.संजय पवार, तंटामुक्तचे अध्यक्ष बाजीराव आढाव, भाऊसाहेब आढाव, पोपट पोटे, नवनाथ थोरात, आण्णासाहेब तोडमल, निवृत्ती आढाव, राजेंद्र आढाव, शिवाजी आढाव, कचरूनाना आढाव, लक्ष्मण आढाव, पिरखाॅभाई पठाण, बाळासाहेब पोटे, ज्ञानेश्वर पवार, चंद्रभान पवार, दगडू पोटे, लक्ष्मण आढाव, नानासाहेब तनपुरे, भाऊसाहेब सोडनर, चाॅदभाई शेख, बाबुराव मकासरे, विकास मगर, वसंत आढाव, बाळासाहेब आढाव, दगडू पोटे, अदिनाथ काळे, रमेश चोथे, प्रकाश वाघ, गोरक्षनाथ गुंड, सागर नेहे, बबन साळुंके, कोंडीराम विटनोर, सुञसंचालन डाॅ.बाबासाहेब आढाव यांनी केले तर शेवटी आभार शिवाजी आढाव यांनी मानले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close