शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१.
अजब सरकार..!! कवी:डॉ.बाबा शिंदे-शिरुर..!!
(अजब सरकार!)
करावे शिक्षण..
तुम्ही उच्च कोटी!
वाट तरी ना पहावी..
तुम्ही नोकरीसाठी!
शिक्षण घ्यावे फक्त ...
छंद जोपासण्यासाठी!
पदवी घ्यावी..
बरे वाटण्यासाठी!
करावी जरी वाटली..
तुम्हांस मग शेती!
वाटू न दयावी..
बुडण्याची भीती!
पिके करा कोणतीही..
भाव विचारु नका!
सेवा करा देशाची..
देशद्रोही बनू नका!
देश बदलतोय..
समजून घ्या!
रस्ते बागायतातून..
जाऊ द्या!
अर्धी तर अर्धी..
किंमत घ्या!
वेठबिगार म्हणून जगा..
पण रस्त्यांसाठी शेती दया!
जन्म बळीराजा तुझा..
बलिदानासाठी!
रस्ते टोलचे गरजेचे..
असतात देशासाठी!!!
कवी:डॉ.बाबा शिंदे.
(शिरुर)
9822209593
(21/12/2021)
#सुरत हैद्राबाद ग्रीन फिल्ड महामार्ग.
# I support Farmers agitation.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

