शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २१ डिसेंबर २०२१
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या भूमिगत गटार भूमिपूजन कार्यक्रमाकडे महाविकास आडीच्या नेत्यांनी फिरविली पाठ
आ.विखेंची विखे समर्थकांबरोबर बैठकीमुळे देवळाली प्रवरात भाजप असव्यस्थ ?..!!
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या भूमिगत गटार प्रकल्प टप्पा क्र 1 चा भूमिपूजन आ. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाकडे महाविकास आघाडीचे खासदार, आमदार यांनी पाठ फिरविल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.फ्लेक्स बोर्डवर महाविकास आघाडीच्या खासदार व आमदार यांचे नाव फोटो टाळल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासदार व आमदार यांनी कार्यक्रमाकडे फिरकू नये म्हणून मोर्चे बांधणी केली होती असे समजते.
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या राहुरी फँक्टरी येथिल भूमिगत गटार भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. याकार्यक्रमाच्या निमंञण पञिका छापण्यात आल्या होत्या. निमंञण पञिकेवर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रावादीचे अरुणकाका जगताप, काँग्रेसचे आ.डाँ.सुधीर तांबे, आ.लहु कानडे आदींच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला होता. परंतू नगर पालिकेच्या सत्ताधारी भाजप गटाने फ्लेक्स बोर्ड तयार आ.राधाकृष्ण विखे, चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. दर्शनी भागित हे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावे व फोटो टाळल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावे व फोटो प्रसिद्ध न केल्याने भाजपाची दुटप्पी भुमिका उघड झाली. त्याचा परीणाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहु नये म्हणून नेत्यांकडे मोर्चे बांधणी केली. महाविकास आघाडीचा एक हि नेता या कार्यक्रमाकडे फिरकला नाही.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. भूमिगत गटारासाठी नगरविकास खात्याने 50 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्याच खात्याचे राज्यमंञी ना. प्राजक्त तनपुरे राहुरी तालुक्याचे रहिवाशी असतानाही ना. तनपुरे यांना साधे निमंञन सुद्धा दिले गेले नाही. प्रोटोकाँल म्हणून राज्यमंञी तनपुरे यांना आमंञण देने महत्वाचे होते. नगर पालिकेच्या सत्ताधारी भाजप गटाने जाणीवपूर्वक टाळले होते. त्यामुळे राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी तीर्व नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रावादीचे नगरसेवक शैलेंद्र कदम व नगरसेविका सुनिता थोरात यांनी भूमिपूजना पुर्वीच दिड कोटी रुपयांची अनियमता असल्याने भूमिगत गटारीच्या कामास स्थगितीची मागणी केली आहे.
यावेळी नगरसेवक अदिनाथ कराळे हे उपस्थित नव्हते. कार्यक्रमास सर्व नगरसेवक वृंदावन काँलनीतील नागरीक उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

