shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व बालचित्रकला बीटस्तरीय स्पर्धा निमगाव केतकी येथे हसतखेळत पार.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  व बालचित्रकला बीटस्तरीय स्पर्धा निमगाव केतकी येथे हसतखेळत पार.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा निमगावकेतकी या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या विध्यार्थ्यांच्या वक्तृत्व, निबंध, सामान्यज्ञान,प्रश्नमंजुषा व बालचित्रकला या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.स्पर्धेचे उदघाटन पर्सिसटेंट फाउंडेशन((सी .वाय. दी. ए  च्या) पूजा कुलकर्णी मॅडम,पंचायत समिती इंदापूर चे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट , गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे , ग्रामसेवक अमोल मिसाळ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाले.प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी केले.स्पर्धे बाबतची माहिती विस्तार अधिकारी सुनील मुगळे यांनी दिली.
स्पर्धेसाठी काटी,व्याहाळी,शेळगाव,निमगाव,निमसाखर या पाच केंद्रातील स्पर्धकांना गटविकास अधिकारी विजयकुमार परीट  व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी शुभेच्छा दिल्या.केंद्रप्रमुख मारुती सुपुते यांनी स्पर्धा प्रकारांच्या अटी व नियम सांगितले. सर्व स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटात झाल्या.स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या मुलांची तालुकास्तरावर निवड करण्यात आली ते स्पर्धानिहाय विद्यार्थी व शाळा पुढीलप्रमाणे.वक्तृत्व स्पर्धा मोठा गट-मधुरा शेखर मिसाळ कडबनवाडी,लहान गट-प्रिया दत्तात्रय मकर राऊतवाडी.
निबंध स्पर्धा मोठा गट-प्रेरणा सुभाष पवार व्याहाळी,लहान गट..आराध्या महेश वडापुरे वडापुरेवस्ती,प्रश्नमंजूषा मोठा गट-वेदांत सचिन गुधाटे व्याहाळी,लहान गट-प्रणाली नानासो भोसले भोंगळेवस्ती,सामान्यज्ञान स्पर्धा मोठा गट सुमित पोपट सूर्यवंशी व्याहाळी,लहान गट-मानसी सचिन पवार व्याहाळी तसेच बालचित्रकला स्पर्धेतील गटनिहाय यशस्वी विद्यार्थी लहान गट आदित्य अशोक भोसले.. काटी,मध्यम गट- गायत्री गणेश भोसले निमगाव व मोठा गट- पूर्वा उमेश बरीदे व्याहाळी.परीक्षण करण्याचे काम बीटमधील शिक्षकांनी केले. (सी .वाय. दी. ए )प्रकल्पाची यशस्वीता शाळा भेटीत दिसत असल्याने प्रेसिडेंट फाउंडेशन च्या पूजा कुलकर्णी, सी .वाय. दी. ए  चे कौस्तुभ, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी व्याहाळी केंद्रातील  सतिश भोंग सरांचे व  आज भेट दिलेल्या भोसले वस्ती(निमगाव) शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.आभार संचालक किरण म्हेत्रे यांनी मानले.
close