shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध - हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन - इंदापूर मतदार संघातून निवड

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध 
  - हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन
  - इंदापूर मतदार संघातून निवड 

फोटो :- इंदापूर अ मतदार संघातून बिनविरोध निवड झालेबद्दल अप्पासाहेब जगदाळे यांचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.

 इंदापूर: प्रतिनिधी( दि.२२ डिसेंबर २०२१)
          पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२१-२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी  प्रतिष्ठेच्या इंदापूर ' अ ' मतदार संघ तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे यांची चौथ्यांदा संचालकपदी आज बुधवारी ( दि.२२) बिनविरोध निवड झाली. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या निवडीबद्दल आप्पासाहेब जगदाळे यांचे अभिनंदन केले.
      आप्पासाहेब जगदाळे हे सुमारे वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अप्पासाहेब जगदाळे यांचाच एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची पुन्हा संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीबद्दल पुणे येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अप्पासाहेब जगदाळे यांचे अभिनंदन केले. यावेळी उदयसिंह पाटील, रमेशमामा खांदवे, अमरसिंह पाटील, संदीप निंबाळकर, संजय उभे, सुनीलमामा झांबरे, संतोष गलांडे आदी उपस्थित होते.
   *चौकट :-
       इंदापूर येथे गुरुवारी सत्कार
       -------------------------------
पुणे जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल गुरुवारी (दि.२३) भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते अप्पासाहेब जगदाळे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. इंदापूर येथे निकिता लॉन्स येथे हा सत्कार कार्यक्रम सकाळी ११ वा. होणार आहे.
____________________________

close