आप्पासाहेब जगदाळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध....
इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी आज बुधवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रणजीत निंबाळकर यांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही तिसरी निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
यापूर्वी निरा भिमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यात पाटील व जगदाळे यांना यश आले होते. त्यानंतर आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे.
गेली १९ वर्ष “अ” वर्ग सोसायटी प्रतिनिधी मतदारसंघात आप्पासाहेब जगदाळे हे संचालक म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. पुन्हा एकदा पाच वर्षासाठी त्यांना संधी मिळाली आहे. या मतदारसंघावर आप्पासाहेब जगदाळे यांची जोरदार पकड आहे.

