शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१
पोलिस अधिकाऱ्यांच्या नामुष्कीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना खाव्या लागतात जेलमधील कैद्यांच्या शिव्या ?..!!
राहुरी : येथिल पोलिस ठाण्यात सध्या एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी आहे. या आरोपीला न्यायालयाने जामीन न दिल्याने राहुरी कोठडीत मुक्काम वाढलेला आहे. सदरील आरोपी हा कायम या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिलेला आहे. स्वतः स्वयंभू समाजसेवक म्हणून घेवून कायम गोरगरीब, अशिक्षित लोकांना लुबाडण्याचे काम याच्याकडून करण्यात आलेले आहे.
राहुरीतील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला रस्त्यात लुटण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. जेल मध्ये त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. खाकी वर्दीला पाहून भल्याभल्यांचे गाळण उडते परंतु राहुरी येथिल पोलिस अधिकारी कठोर भूमिका घेत नसल्याने पोलिस कर्मचार्यांना जेलमधील आरोपी कडून शिवीगाळ केली गेली असे समजते. वास्तविक पहाता जेल मधील आरोपीने गैरवर्तवणूक केल्यामुळे तात्काळ पोलिसांकडून गुन्हा दाखल होणे गरजेचे होते. परंतु जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांना शिवीगाळ करणारा आरोपी कोण ? पोलिस अधिकाऱ्यांनी सदर आरोपीला पाठीशी घालण्याचे कारण काय? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

