जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची स्थिर वीज आकारणी घरगुती दरानुसार करावी -
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने दिले निवेदनपत्र.
इंदापूर प्रतिनिधी:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची स्थिर वीज आकारणी घरगुती दरानुसार करावी . जेणेकरून वीजबील भरणे सोयीचे होईल अशा आशयाचे निवेदन पत्र ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना आज दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजी मंत्रालयात इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी दिले.
या निवेदन पत्रा मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना सध्या पब्लिक सव्र्हींस मधून वीज आकारणी होत आहे . त्यामुळे प्रतिमहिना स्थिर आकारणी ३७३ रु.पडत आहे . त्यामुळे प्रतिमहिना कमीतकमी ३७३ ते १००० रू पर्यंतचे वीज बिल शाळांना येत आहे . वर्षाचे दहा ते बाराहजार बील भरणे जिल्हा परिषद शाळांना अशक्यक गोष्ट होऊन बसली आहे वीजबिल भरणेसाठी शासकीय अनुदान मिळत नाही. त्यामुळे शाळांची वीज कनेक्शन कट करण्यात आलेले आहेत . जिल्हा परिषद शाळांमध्ये साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . डिजिटल शाळांची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी ई – लर्निंग सारखे शैक्षणीक उपक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत म्हणून आपण आपल्या स्तरावरून सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची स्थिर वीज आकारणी घरगुती दरानुसार करावी . जेणेकरून वीजबील भरणे सोयीचे होईल अशा आशयाचे निवेदन पत्र इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत व किसान काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले यांनी दिले.

