देहरे - सविस्तर माहिती अशी की,दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी शिंगवे नाईक येथील निवडणुकीनंतर पहिलीच ग्रामसभाभा पार पडली.
सदर सभेत विरोधी पक्षनेते गटाचे एकनाथ जाधव यांची ग्रामसभेने एकमताने व विशेष म्हणजे बिनविरोध अध्यक्षपदी निवड केली आहे.त्यांच्याकडून यापुढील काळात गावातील तंटे गाव स्तरावरच मिटावेत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके व ग्रामस्थांकडून होत आहे.भविष्यात अशाच प्रकारचे काम केले जाईल असे आश्वासन देखील एकनाथ जाधव यांनी ग्रामस्थांना दिले आहे..तसेच जाधव यांचे सर्व ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे.

