नायजेरिया येथून नगर जिल्ह्यात आलेली ओमिक्राॅनबाधित महिला उपचारानंतर डिस्चार्ज..!!
श्रीरामपुरातील ओमिक्रोन बाधित महिलेला डिस्चार्ज...!!
श्रीरामपुर : नायजेरिया येथून श्रीरामपूरात आलेल्या ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेचा उपचारानंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने महिलेसह तिच्या मुलाला नुकतेच सुखरुप घरी सोडण्यात आले.
ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. असून काल (रविवारी) त्यांची पुन्हा ओमिक्राॅनची तपासणी केली. त्यात सदर महिलेसह सहा वर्षीय मुलाचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तसेच त्यांच्या कुटूंबातील इतर लोकांनी देखील कोरोना लसीकरण केलेले होते.
त्यामुळे उपचार घेवून त्या लवकर बरया झाल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.नोकरीनिमित्त नायजेरिया (वेस्ट आफ्रिका) येथे गेलेल्या महिलेसह त्यांचा सहा वर्षांचा मुलगा १५ डिसेंबर रोजी
श्रीरामपूरात आले होते. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने त्यांची कोरोना तपासणी केली. त्यात महिला आणि दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे ओमिक्राॅन तपासणीसाठी त्यांच्या स्रावाचे नमुने तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.
खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील सुमारे ५५ नागरीकांचा शोध घेवून सर्वांची कोरोना तपासणी केली. सुदैवाने त्यातील सर्वांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले.परंतू शुक्रवारी (ता.२४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिलेचा
ओमिक्राॅनचा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. अहमदनगर जिल्ह्यात अखेर ओमिक्राॅनचा शिरकाव झाल्याना जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

