shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोविड लसीकरनामध्ये तिवसा तालुका चमकला

अमरावती । संपूर्ण लसीकरण हाच कोविड ला हरवण्याचा एकमेव मार्ग आहे. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणासाठी माघील एक वर्षापासून कंबर कसली आहे.तरी देखील काही ठिकाणी लसीकरणाला पाहिज़े तेवढा प्रतिसाद मध्यंतरी मिळत नव्हता.
  शासनाने लसीकरणासाठी अनेक अभियान राबवले या अभियानाची अंमलबजावणी सर्वत्र उत्कृष्ट रित्या आरोग्य अधिकारी,कर्मचाऱ्यांनी केली.

        अमरावती मधील तिवसा तालुक्याने या लसीकरणाच्या  अभियानांचे उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्षेत्रातील तळागाळातील सामान्य जनतेला लसीबाबत जागृत केले.मोबाईल टीम द्वारे पूर्ण गावातील बेडला खिळलेल्या रुग्णांना देखील घरोघरी जाऊन लसीचा लाभ दिला.याचेच फलित म्हणजे आज पूर्ण अमरावती जिल्ह्यातील आरोग्य केंद्रापैकी तिवसा तालुक्यातील दोन आरोग्य केंद्राने म्हणजेच मार्डी व कुऱ्हा यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवळा व पूर्ण जिल्ह्यातून तिवसा तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला.

            अमरावती जिल्ह्यातून तिवसा तालुक्याचा प्रथम क्रमांक आल्यामुळे आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.पवनीत कौर मॅडम व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा साहेब यांनी तिवसा तालुका आरोग्य अधिकारी पोटपिटे मॅडम यांचा गौरव केला आहे

                हे साद्य झाले फक्त तिवसा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी मा.डॉ.पोटपिटे मॅडम यांचे योग्य नियोजणामुळे आणी कठोर परिश्रमामुळे.पोटीपीटे मॅडम यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक आरोग्य विषयी गोष्टीकडे कटाक्षतेने लक्ष ठेऊन त्यांच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना प्रति योग्य समन्वयमुळे हे शक्य झाले आहे.
close