shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्जत तालुक्यातील चापडगावची अनुराधा राऊत राष्ट्रीय योगासन स्पर्धेत देशात सहावी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ 

कर्जत तालुक्यातील चापडगावची अनुराधा राऊत राष्ट्रीय योगासन स्पर्धेत देशात सहावी..!!

कर्जत : चापडगावचे विद्यार्थी कायमच वेगवेगळ्या स्पर्धेत बाजी मारताना दिसतात. त्यातच भर म्हणून आता चापडगावच्या अनुराधा पंकज राऊत हिने १४ ते १६ वर्षे वयोगटात देशपातळीवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावून महाराष्ट्रासह कर्जतची शान देशपातळीवर उंचावली आहे.

         योगा या व्यायाम प्रकारामध्ये प्राविण्य मिळविणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, आहार, सातत्यपूर्ण कसरत गरजेची असते. सध्याच्या काळात योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे योगाची स्पर्धाही वाढत आहे. अशातच चापडगावच्या अनुराधाने योगा स्पर्धेत राष्ट्रीय पातळीपर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या चापडगावच्या लेकरांचा चापडगावकरांना सार्थ अभिमान आहे.


     अनुराधाने देशपातळीवर घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये’ सहावा क्रमांक पटकाविल्याबद्दल चापडगावकरांच्या वतीने तीचे मन:पूर्वक अभिनंदन..-ॲड. विकास शिंदे,-वृक्षवल्ली ग्रुप, चापडगाव.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close