shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री साहेब पारधी समाजाला आता तरी न्याय मिळेल का..? हि झाडाझडती किती दिवस करणार ?.....साहित्यिक नामदेव भोसले


प्रतिनीधी । सुनिल ज्ञानदेव भोसले 

पुणे । आज देखील कुठे चोरी झाले की सर्वात पहिली झाडाझडती पारधीचीच होते,पारतंत्र्यातील इंग्रज परवडले परंतु  स्वातंत्र्यातील पोलीस आज देखील पारधी समाजाकडे जातीय भेदभाव करून टाकाऊ नजरेने पाहतात. कसलाही तपास विनापरवानगीने रात्री- मध्यरात्री पालांवर जाऊन झाडाझडती घेतात. त्यामुळे शिक्षण घेणारी मुले भयभीत होतात. रात्री पोलीस घरी आल्यामुळे गावातील लोकही जातीय भेदभाव करतात. हे स्वातंत्र्यात चिंताजनक आहे,..असे मत आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी वेक्त केले.

आज त्यानी  इंदापूर शहरातील सरस्वती नगर येथे आदिवासी पारधी पाड्यावर भेट दिली.
या वेळी शेवराई सेवाभावी संस्थाच्या वतीने 160 मुलांना मिठाई व कपडे वाटप करण्यात आले.

पुढे नामदेव भोसले म्हणाले की गेली चार पिढ्या हे पारधी कुटुंब या गरीबी मध्ये राहतात परंतु त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाने आजवर पाहिले नाही. पाच वर्षे झाले कि मतदाना पुरते हात जोडत येतात.आणि पुन्हा पाच वर्षे निवडून आल्यानंतर पुढारी कुठे गायब झाले ते कळत नाही.आजुन राज्यातील   आदिवासी पारधी समाज्याचे प्रश्न कोणत्या मंत्र्यानी अधिवेशनात दिलखुलासपणे कोणी मांडल्याचे ऐकिवात नाही.

आज इंदापूर तालुक्यामध्ये वीस आदिवासी पारधी समाजातील  कुटुंबे आकाश हे गोधडी व धरती हे हातरून असे समजून, ऊन, वारा, पाऊस, आपल्या अंगाखांद्यावर घेऊन वाऱ्याने  चिंध्या चिंध्याचे पाल रस्त्याच्या कडेने फडफडणे दिसतात, परंतु त्या आतिल दुःख कोणाला कधीच समजले नाही, हे अतिशय दुःखद बाब आहे. 

गेले पाऊणशे वर्षाचे सुखसुविधा ह्या पुढाऱ्यांच्या व मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांसाठी व पाहुण्यांसाठी आहेत की काय असा प्रश्न पडतो. आजपर्यंत प्रशासनाला यांचे दु:ख दिसले नाही हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी केला. शासकीय आलेल्या  सवलती नगरपालिका व  ग्रामपंचायत हे कुणाला देतात हे माहीत नाही..?
ज्या महानगरपालिका व ग्रामपंचायत शासकीय सोविधान गरीबासाठी काम करत नाहीत अशा महानरपालीका ग्रामपंचायतीवर 
करावी तरच खऱ्या दुःखी पिडीत शोषित कुटुंबांना शासन दरबारी न्याय मिळेल.

आज  मोलमजुरी करून खाणारे, स्वाभीमानाने कष्टाने जगणारे  आदिवासीच्या घरी जाऊन रात्रीचे विना परवाणगीने महिलांचे व कुटुंबाची झाडा झडती घेणा-या पोलीस अधीकारी व गावपुढारी यांच्यावर आदिवासींची झडती घेणा-या लोकांवर ऑट्रोसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी, 
आज या कारवाई मुळे त्रस्त असलेल्या समाजातील तरुण व तरुणी यांचे डोळे भरून आले.
 गेली सत्तर वर्षांमध्ये इंदापूर नगरीमध्ये भारताचे राष्ट्रपती,  महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, अनेक मंत्री, खासदार, आमदार, यांचे दौरे झाले परंतु आदिवासींचे पाल त्यातील पिढा कोणाला दिसले नाही. गरिबाचे गाणे गुणगुणत राहिले आता तरी द्याल का शासनाच्या सवलती, वाट पाहत शेवटचा श्वास  घेण्याची वेळ आली परंतु शासनाला या गरीब कुटुंबाला मदत करण्याकरता वेळ मिळाला नाही. वर्षानुवर्ष  गेले, नवीन वर्ष आले, गरीब जिथल्या तिथेच राहीले. हि चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात चालली आहे...!

या वेळी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले. अनिल काळे,सागर पवार, शाम काळे, सचिन भोसले,स्वप्रित भोसले,रमेश काळे,प्रनीता काळे,उमेश काळे ऊपस्थित होते.

मानसं भेटत गेली,मला आवडली आणी मी ते जोडत गेलो !!
चला..
या वर्षाचा अखेरचा आठवडा,
खुप सारे धन्यवाद..!!
तुमंची ही साथ यापुढे ही असीच कायम असू द्या...
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...
शेवराई सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे
फोन, 8888698870
9960984170 भोसले.
close