shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधभूषण फाउंडेशन व ऋण फाउंडेशन यांनी केला विविध कलागुण पुरस्कृत विद्यार्थ्यांचा सत्कार



प्रतिनिधी : आसावरी वायकर

कोथुळ : ८ / श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे
शालेय स्पर्धेमध्ये व कलेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मुलांचा व बाहेरील क्षेत्रात नाव उंचावणाऱ्या तरुणांचा सत्कार बुधभूषण फाऊंडेशन व ऋण फाऊंडेशन  यांच्या माध्यमातून
 करण्यात आला. यामुळे मुलांमध्ये काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होईल व त्यांना प्रोत्साहन मिळेल . या कार्यक्रमात किसन लाटे या तरुणाचा सत्कार करण्यात आला . 

हा संघर्ष त्याने कसा केला याची थोडक्यात त्याने माहिती सांगितली .बारावी पास झाल्यानंतर किसन लाटे याने व्यायामाची व आर्मी भरतीची  तयारी सुरू केली.कोरोनामुळे भरती वेळेवर सुटली नाही पण व्यायामाची व भरतीची तयारी तशीच सुरू होती.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती . 


किसन घरीच व्यायाम करत होता. हातावर चालणे,हवेत पूर्ण शरीर फिरवून उड्या मारणे हा सराव रोजच्या रोज चालू होता.मग किसन ते व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर टाकत होता. किसनला स्पर्धेची काही माहिती नव्हती पण दत्ता जरे यांनी  सोशल मिडियावर असणारे व्हिडीओ पाहिले आणि ते संघर्ष अकॅडमीचे संस्थापक बजरंग नेटके सरांना दाखवले मग त्यांनी किसनला गोवा येथे होणारी खेलो इंडिया युथ गेम या स्पर्धेसाठी घेवून गेले . महाराष्ट्रातून कोणीही जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी आलेलं नव्हतं माझ्यासोबत जे खेळणार होते ते तमिळनाडू मधील खेळाडू होते त्यांच्या सोबत त्यांचे असणारे कोच होते पण  माझ्यासोबत कोणीही कोच व प्रशिक्षक नव्हता. अशा प्रकारे आम्ही खेळलो व किसनला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला व त्यासाठी सुवर्ण पदक मिळालं.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील तरुण व सरपंच आणि चेअरमन व तसेच बुधभूषण फाऊंडेशनचे सचिव उपस्थित होते व फाऊंडेशनचे चेअरमन अमोल दुरंदे व व्हाईस चेअरमन दुर्गेश राठोड यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
close