shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साकुर - संगमनेर रस्त्यावर अपघात ; एकाचा मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०८ डिसेंबर २०२१ 

संगमनेर : तालुक्याच्या साकूर परिसरातील चिंचेवाडी परिसरात रविवार ता.५ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रावसाहेब उर्फ घुंगरु चंदू सावंत (वय 50, रा.दाढ बुद्रुक, ता.राहाता) हे साकूर येथील भंगार व्यावसायिकाकडे काम करत होते. रविवारी त्यांना साकूर-संगमनेर रस्त्यावरील चिंचेवाडी परिसरात अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी विजय मच्छिंद्र मकवाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close