shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

औंढा नगरपंचायत निवडणूकीच्या बातम्या वर औंढा तालुका पत्रकार संघाचा बहिष्कार..!!

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) 

दि.८,हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ निवडणूक प्रक्रिया सध्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे. नगरपंचायत निवडणूक संदर्भामधली माहिती ही पत्रकार कक्षामध्ये दिल्या जात नसून पत्रकार कक्ष ही  तहसील मध्ये स्थापन करण्यात आलेला नाही. 





पत्रकारांना नगरपंचायत निवडणुकी संदर्भात कुठलीही माहिती वेळेवरनिवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन जयस्वाल हे देत नाहीत तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.त्यामुळे औंढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना तक्रार निवेदन औंढा नायबतहसीलदार सचिन जोशी मार्फत देण्यात आलेले आहे. तरी या निवेदनाची दखल हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी त्वरित घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित करावे अन्यथा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१अनुषंगाने जे काही बातम्या असतील त्या बातम्या वर औंढा  तालुका पत्रकार संघ बहिष्कार टाकेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर औंढा  पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर स्वामी ,बाळासाहेब साळवे, गजानन वाखरकर, गंगाधर देवकते, विलास काचगुंडे, गजानन नाईक, दत्ता शेगुकर, नागनाथ मुळे, रवींद्र पवार ,कृष्णा ऋषी, शिवाजी देशपांडे सह औंढा तालुका पत्रकार संघाच्या स्वाक्षऱ्या असून निवेदन देतेवेळी ते हजर होते.

close