शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१
राज्यातील सरसकट शाळां संदर्भात अंतिम निर्णय कॅबिनेट मध्ये घेण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार..!!
प्रतिनीधी : राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय आधी जिल्ह्यांच्या पातळीवर प्रशासनाच्या हाती दिला होता.यातून निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन बुधवार १५ डिसेंबर २०२१ रोजी बैठक घेणार आहे. या बैठकीत शासन राज्यातील शाळा सुरू करायच्या की नाही या संदर्भातला निर्णय घेईल. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये शाळा सुरू आहेत तर काही ठिकाणी शाळा बंद आहेत. राज्यात शाळांबाबतच्या निर्णयावरुन गोंधळाची स्थिती आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी तसेच राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर बैठक होणार आहे. राज्याचे मंत्रिमंडळ बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळांबाबतचा निर्णय घेईल, असे अजित पवार म्हणाले.
राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती..!!
नाशिक शहरातील महापालिकेच्या हद्दीतील शाळा सोमवार १३ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार आहेत. औरंगाबाद महापालिकेने १५ डिसेंबर नंतर निर्णय घेऊ असे आधीच जाहीर केले होते. आता राज्य शासनाचा निर्णय बुधवारी जाहीर झाला तर तोच राज्यभर लागू होईल.औरंगाबाद जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत मागे आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात बुधवार १५ डिसेंबर २०२१ पासून दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी लस घेतली नसल्याचे आढळल्यास त्यांना १५ दिवसांसाठी ५०० रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. हा निर्णय औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम होईल आणि दुसऱ्या डोससाठी पात्र असलेले लवकर लसीकरण पूर्ण करतील, अशी आशा अजित पवार यांनी व्यक्त केली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

