shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी मध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार, एक जण जखमी..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ 


भल्या पहाटे तरुणावर साईबाबांच्या शिर्डीत झाडल्या गोळ्या..!!
"शिर्डीतील लक्ष्मीनगर भागात एका खाजगी पार्किंगमध्ये एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. या दुर्दैवी घटनेत शिर्डी शहरातील युवक सूरज ठाकूर हा गंभीर जखमी झाला आहे. भल्या पहाटे गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या आवाजामुळे अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, संबंधित तरुण घटनास्थळी गंभीरावस्थेत पडला होता."

शिर्डी : शहरातील प्रायव्हेट पार्किंग मध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये एक करून जखमी झाल्याचे समजते या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
       शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये प्राव्हेक्ट पार्किंग येथे अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला आहे. या गोळीबार मध्ये शिर्डीतील तरुण सुरज ठाकूर हा जखमी झाला आहे. जखमी तरुणाला साईबाबा सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे परंतु गोळीबार करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत आरोपींचा शोध सुरू केला आहे. आज दिनांक 10 डिसेंबर रोजी भल्या पहाटे ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात अनेक तालुक्यात गावठी कट्टे सापडत असून जिल्हा गुन्हे अन्वेषण अथवा स्थानिक पोलिसांकडून कारवाई पण होत आहे. मात्र यावरून जिल्ह्यात गावठी अनधिकृत, विनापरवाना पिस्तुल मोठ्या प्रमाणात असल्याचं स्पष्ट होत आहे.साईबाबांच्या मुळे शिर्डी हे मोठे आर्थिक केंद्र बनलेले आहे.यातून अनेक अवैध व्यवसाय शिर्डी आणि परिसरात सुरू असल्याचे अनेकदा समोर देखील आले आहे. यातूनच अनेक गुंड प्रवृत्तींचा शिर्डीत उदय झाला आहे. पोलीस-प्रशासनाने अशा गुंड प्रवृत्तीना आवर घालण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close