श्री.दत्त जयंतीची ४४ वर्षाची परंपरा जपणारे १२० वर्ष वयाचे निवृत्ती कुदळे यांचा काळेलवाडी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार संपन्न.
भक्तिमय वातावरणात काळेलवाडी न.१ येथे श्री दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सर्व काळेलवाडी नं.१ ग्रामस्थांच्यावतीने सुरू.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नं.१ येथील श्री.दत्त जयंतीची ४४ वर्षाची परंपरा जपणारे १२० वर्ष वयाचे निवृत्ती कुदळे यांचा काळेलवाडी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब समवेत खांद्यावरती विना देऊन पुष्पहार घालून अखंड हरिनाम सप्ताह चे व्यासपीठ चालक ह. भ .प. हनुमंत गोडसे यांच्या हस्ते व काळेवाडी नं. १ येथील सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये ह. भ. प.निवृत्ती कुदळे यांच्या सांप्रदायिक कार्याचा गौरव म्हणून सत्कार(दि.१६) संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठ चालक हनुमंत गोडसे म्हणाले की, निवृत्ती कुदळे परिवार व काळेल वस्ती ग्रामस्थ यांच्यावतीने मागील १४ वर्षापूर्वी या ठिकाणी श्री दत्त मंदिर उभारून पंढरपूर वरून दत्तमूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दत्त जयंती निमित्त प्रत्येक वर्षी करून येथील सर्व ग्रामस्थ अतिशय भाव भक्तिमय वातावरणात एकोप्याने साजरा करत आहेत. ४४ वर्षाची श्री दत्त जयंती ची परंपरा चालू ठेवणारे निवृत्ती कुदळे यांचे वय १२० वर्ष असून त्यांनी चाळीस वर्ष आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली. तसेच कुदळे मळा याठिकाणी छोटे दत्त मूर्ती असून त्या ठिकाणी तीस वर्ष दिवंगत हरिभाऊ काळेल, मारुती काळेल, शिवराम गेंड, लक्ष्मण गेंड, राम गेंड, शंकर गेंड, तसेच श्री भगवान काळेल, श्री.भिवा गेंड, श्री.भिवा कुदळे, श्री. लक्ष्मण शिंदे यांच्यासह जयंती उत्सवाची परंपरा चालू केली आणि त्याचे रूपांतर आज श्री.दत्ताचे मोठे मंदिर आणि जयंती उत्सवानिमित्त सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आणि त्यामध्ये काकडा आरती, गाथा भजन, हरिपाठ, प्रसाद, कीर्तन ,हरिजागर आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या चालू असलेल्या अखंड हरिनाम सत्यामध्ये व्यासपीठ चालक हनुमंत गोडसे, गाथा भजन: मधुकर माने, हौसराव नरळे ,सुखदेव काळेल, मारुती काळेल, मनोहर धुमाळ, मोहन कचरे, तात्याराम सातव, बाळासाहेब नरळे, हार्मोनियम साथ: बाळू नरळे, तानाजी पाटोळे गुलाब तांबोळी, हनुमंत पवार, विणेकरी: प्रल्हाद कुदळे( पुजारी), पोपट काळेल, मारुती काळेल, सुखदेव काळेल, किसन शिंदे, मृदंगमनी: तुकाराम गोडसे, सुखदेव सातव, मोहन कचरे ,किसन ओगले, नाना घाडगे, गायनाचार्य: अशोक मोहिते ,अण्णा खामगळ, शहाजी खामगळ, बटू मारकड, महादेव कोकणे, फलफले महाराज, चोरमले महाराज, चोपदार ईश्वर, रामा शिंदे, गणेश नरळे, हरिपाठ :मोहन कचरे, लालासो काळेल, सर्व भजनी व महिला मंडळ बिजवडी, काळेलवाडी, कौठळी, गागरगाव, राजवडी, खामगळवाडी व पंचक्रोशीतील सर्व मंडळी. काकडा: हौसराव नरळे, बाळू बनसोडे, मारुती काळेल, पोपट काळेल सर्व महिला मंडळ काळेलवाडी यांचा सहभाग आहे. मंडप व साऊंड सिस्टिम: जाकीर मंडप कॉन्ट्रॅक्टर बिजवडी.
निवृत्ती कुदळे यांचा सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर माजी सैनिक रामदास निवृत्ती कुदळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

