.प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी
पुणे :- चित्रपट आणि रसिक प्रेक्षक यांच्यात दोन वर्षांच्या कालावधीत खूप फरक पडला आहे. बर्याच ठिकाणी थिएटर सुरू झाली आहेत परंतू मराठी चित्रपटांना रसिकांचा पहिल्या प्रमाणे प्रतिसाद मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
नामवंत कलाकारांनी अभिनय केलेले मराठी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करून रसिकांना मोबाईल अॅपवर चित्रपट पाहता येतो. पण नवोदित कलाकार किंवा निर्माता यांच्या चित्रपटांना ना थिएटर, ना ओटीटी प्लॅटफॉर्म यापैकी कोणताही पर्याय चित्रपट प्रदर्शित करण्याकरता उपलब्ध होत नाही.
मराठी भाषिक टेलीव्हिजन चॅनल्स आहेत तेथेही नवीन कलाकार / निर्माता यांच्या चित्रपटांना स्थान मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातच बहुतेक मराठी चॅनेलवर इतर भाषिक चित्रपट मराठी मध्ये डबींग करून दाखवले जात आहेत. म्हणजे प्रस्थापित चॅनेल नवनिर्माता यांच्या दु:खावर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.
या सर्व बाबींचा आणि निर्माता यांच्या विनंतीवरून star5.live स्टार फाईव्ह डाॅट लाईव या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाममात्र तिकीटावर मराठी रसिक प्रेक्षकांच्या मोबाईलवर मराठी चित्रपट उपलब्ध करून दिले आहेत. सुरुवातीला फक्त पाच चित्रपट वेगवेगळ्या टप्प्यात उपलब्ध होणार आहेत.
आम्ही मराठी भाषिक रसिकांना कळकळीचे आवाहन करत आहोत की आपण प्लेस्टोअरहून स्टार फाईव्ह डाॅट लाईव हे मोबाईल अॅप (ओटीटी प्लॅटफॉर्म) मोबाईल मध्ये इंस्टाॅल करून नवचित्रपटांना, कलाकारांना, निर्माता यांना नवचैतन्य द्यावे.कोणताही चित्रपट न पाहता त्या चित्रपटाबाबत चांगली अथवा वाईट असल्याची व प्रतिक्रिया देऊ नये.
आम्ही खूप कष्टाने चित्रपट तयार केला आहे नाममात्र तिकीट घेऊन चित्रपट पाहून सहकार्य करावे असे अवाहन संजय चौगुले (मारू का हवा), प्रदिप शिंदे (वासू लव सपना), राजेश वाव्हळ / बळीराम गावड (गज्या), महादेव परब (सांगा बाजीराव) याच सोबत अनेक निर्माता यांच्यासह स्टार फाईव्ह डाॅट लाईव या मोबाईल ॲपचे बाळासाहेब गोरे यांनी केले आहे.आमचा मराठी रसिक प्रेक्षकांवर विश्वास आहे ते मराठी कलाकृतींचा अवमान करणारच नाहीत हाच मोठा विश्वास आहे.

