shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामसेविका गोसावी ( गिरी) मॅडम यांचा शिंगवे ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते गट यांच्याकडून सन्मान तसेच पुढील कार्यास शुभेच्छा..!!


शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिंगवे नाईक:- शिंगवे ग्रामपंचायतला नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेविका गोसावी ( गिरी) मॅडम यांचा शिंगवे ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते गट यांच्याकडून सन्मान तसेच  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..!


 
सविस्तर माहिती अशी की, दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिंगवे नाईक येथे नव्याने रुजू झालेल्या ग्रामसेविका गोसावी मॅडम यांनी पंचायत समिती नगर येथून आलेले विस्तार अधिकारी तुपे यांचा समक्ष पदभार स्वीकारला तसेच मागील ग्राम सेवक एम. बी. पुंड यांनी देखील तो सुपूर्त केला. 

यावेळी उपस्थित विस्तार अधिकारी तुपे , पुंड भाऊसाहेब , नवीन ग्रामसेविका गोसावी मॅडम यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. तसेच  विशेष बाब की, गिरी मॅडम यांना पुढील शासकीय दैनंदिन कामकाजास शुभेच्छा देखील माजी सरपंच विश्वासराव जाधव,पंचायतचे  विद्यमान सदस्य, विरोधी पक्षनेते अमोल डोळस,महेंद्र कोळकर, सामाजिक कार्यकर्ते हरीश शेळके,आयाज सय्यद, संदीप पुंड या मान्यवरांनी दिल्या..!

अत्यंत विशेष बाब हि की..गिरी मॅडम यांच्या कडून यापुढील काळात दैनंदिन शासकीय कामकाजात पारदर्शकता असेल अशी अपेक्षा व्यक्त केली, तसेच नियमबाह्य व बेकायदेशीर काम त्या कधीच करणार नाही असा विश्वास आणि अपेक्षा देखील उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली..!

गोसावी मॅडमचा कामाचा नमुना देखील पाहायला आजच मिळाला.आज सकाळपासूनच गिरी मॅडम यांनी घरकुल योजना संबंधित सर्वच काम शासकीय मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अतिशय चौकसबुद्धीने व नियोजनबद्ध पद्धतीने व लक्ष घालून केलं..!म्हणून सदर कामाची दखल घेऊन अमोल डोळस यांनी गिरी मॅडम यांच्या कामाचं कौतुक देखील केलं..!

या  कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायतचे लिपिक सागर डोळस, संगणक चालक शिंदे मॅडम,  पाणी पुरवठा कर्मचारी शिवाजी जाधव,  प्रमोद साळवे, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
close