shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकरी बांधवांना औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीमध्ये मोठी संधी - संचालक संशोधन डॉ. शरद गडाख..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१ 

शेतकरी बांधवांना औषधी व सुगंधी वनस्पतींच्या लागवडीमध्ये मोठी संधी - संचालक संशोधन डॉ. शरद गडाख..!!

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य हे औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी अनुकुल असून राज्यातील आयुर्वेद उद्योग, शहरातून औषधी वनस्पतींची वाढती मागणी आहे. विकेल ते पिकेल हे सरकारचे धोरण आहे. या धोरणाच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड एस.एच. केळकर सारख्या कंपनीच्या सहकार्याने केल्यास याचा फायदा शेतकर्यांना होईल. जिरॅनिअम या सुगंधी वनस्पतीला संबंधीत कंपनीकडून मिळत असलेल्या हमीभावामुळे भविष्यात ते महाराष्ट्रातील एक नंबरचे पीक होऊ शकते. शेतकरी बांधवांनी लागवडीसाठी योग्य अशा औषधी व सुगंधी वनस्पतींची माहिती घेवून लागवड केल्यास त्यांना मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
         औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि सुपारी व मसाला विकास निदेशालय, कालिकत (केरळ) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई येथील एस.एस. केळकर कंपनीचे कृषि विद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुकेशकुमार सिन्हा व देहरे येथील वैभवलक्ष्मी जिरॅनिअम फार्मचे वैभव काळे हे उपस्थित होते. यावेळी वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. विक्रम जांभळे उपस्थित होते.

       प्रशिक्षणाच्या सुरुवातीला धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सुकेशकुमार सिन्हा यांनी जिरॅनियम लागवड व औषधी व सुगंधी वनस्पतींद्वारे उत्पादीत केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल यावर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
          याप्रसंगी जालना जिल्ह्यातील सौ. शारदा जाधव, सौ. रेखा घोगंडे, वैभव काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिवसभर चालणार्या या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. महानंद माने, वैभव काळे, डॉ. विजू अमोलिक, डॉ. विक्रम जांभळे यांनी औषधी व सुगंधी वनस्ततींच्या लागवडी संदर्भात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजू अमोलिक यांनीे केले.

             यावेळी औषधी व सुगंधी प्रकल्पाच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम जांभळे यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी वनस्पती शास्त्र विभागातील अधिकारी, कर्मचारी व राज्यातील विविध जिल्ह्यातून 50 पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close